Yojana

शिष्यवृत्ती एका क्लिकवर

शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना दिल्या जातात.

शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना दिल्या जातात. या सर्व योजनांसाठी एक एकत्रित संकेतस्थळ असावे, हा विचार करूनच शासनाने  महाडीबीटी https://mahadbt.gov.in या पोर्टलची स्थापना केली आहे.

विविध शिष्यवृत्त्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची संधी या पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हे अर्ज ऑनलाइन करायचे असल्याने वेळेची बचतही होईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, निर्वाह भत्ता, विद्या वेतनविषयक योजनांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर स्वत:ची नोंदणी करणे, अर्ज भरणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यापासून ते रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याची सर्व प्रक्रिया आता राज्यस्तरीय डीबीटी पोर्टलमार्फत करण्यात येणार आहे. आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्याची सूचना डीबीटी पोर्टलद्वारे प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांना देण्यात आली आहे.  महाडीबीटी पोर्टल दिनांक ३ ऑगस्ट २०१७ पासून सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी २०१७-१८ पासून शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाकरून नव्याने तयार करण्यात आलेल्या या पोर्टलवरच्या यूजर मॅन्युअल एफएक्यूचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक आधारकार्डाशी संलग्न नाहीत त्यांनी जवळच्या आधार केंद्रावर जाऊन ते करून घ्यावेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत, मार्गदर्शक सूचनाही या पोर्टलवर जाऊन विद्यार्थ्यांना समजून घेता येतील. तसेच पात्रतेचे निकष, संबंधिक शासन निर्णय याची माहितीही पोर्टलवर मिळेल. प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वतंत्र यूजर आयडी तयार करून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.

डीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती योजना देण्यात येणारे विभाग

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग

आदिवासी विकास विभाग

तंत्रशिक्षण विभाग

अल्पसंख्याक विकास विभाग

शालेय शिक्षण विभाग

डीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याची पद्धत

पूर्वतयारी

विद्यार्थ्यांनी आपला आधार क्रमांक काढणे आवश्यक आहे.

कोअर बँकिंग सुविधा असलेल्या बँकेच्या शाखेतच विद्यार्थ्यांने आपले खात उघडावे.

जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला, दहावी, बारावी तसेच मागील परीक्षा उत्तीर्ण झालेला दाखला व गुणपत्रक, जन्मतारखेचा पुरावा, रहिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, प्रवेशित महाविद्यालयाची माहिती, प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती, त्याचा कालावधी, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड, दिव्यांग (अपंग) असल्यास दिव्यांगाचा दाखला, शिधापत्रिका इ. कागदपत्रे तयार ठेवावीत.

नोंदणी कशी करावी ?

इंटरनेट एक्सप्लोरर, गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स किंवा इतर कोणत्याही ब्राऊझरवर जाऊन https://mahadbt.gov.in या संकेतस्थळाचा पत्ता टाइप करावा.

हे संकेतस्थळ उघडल्यावर त्यावरील ‘नवीन नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे.

प्रत्येक विद्यार्थ्यांने या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ज्यांनी याआधी e-scholarship या पोर्टलवर नोंदणी केली होती. त्यांच्यासाठीसुद्धा पुन्हा नोंदणी आवश्यक आहे. आधार क्रमांकाचा उपयोग करून नोंदणी करावी. आधार कार्ड असेल तर हो किंवा नाही पर्याय निवडावा.

त्यानंतर ‘ OTP’ हा पर्याय निवडा.

वैध आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP या पर्यायावर क्लिक करावे.

मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी (One Time Password) टाकून ‘पडताळणी करा’ या पर्यायावर क्लिक करावे.

उपलब्ध विण्डोमध्ये नाव, जन्मदिनांक, फोन नंबर, पत्ता आधार संलग्न बँक खाते नंबर इ. आधार कार्डवरील माहिती आपोआप दिसेल.

आधार क्रमांक नसल्यास ‘आधार कार्ड नाही’ हा पर्याय निवडावा आणि आवश्यक ती माहिती भरावी. तसेच कागदपत्रे अपलोड करावीत.

नोंदणी अर्जाच्या विण्डोमधील सर्व माहिती भरावी. आणि स्वत:चे User Name U Password तयार करावे.

  डीबीटी पोर्टलवर अर्ज कसा भरावा?

महाडीबीटी पोर्टलवर Log in करण्यासाठी Select User वर जाऊन ‘विद्यार्थी’ हा पर्याय निवडावा. यापुढे यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हावे.

लॉग इन झाल्यावर विण्डोजमधील ‘योजना तपशील’ या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर तुम्ही विभागवार योजना पाहू आणि निवडू शकता.

ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तेथे ‘पहा’ या पर्यायावर क्लिक करावे. तसेच मॅट्रिकपूर्व/ मॅट्रिकोत्तर योजनेनुसार पर्याय निवडावा. आवश्यक माहिती भरावी. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, अपंगत्व, कौटुंबिक उत्पन्न इ. पालकांची महिती, शाळा/ महाविद्यालयाची माहिती भरावी.

आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अभ्यासक्रमाचा तपशील भरून सबमिट करावे.

– वर्षां फडके, विभागीय संपर्क अधिकारी

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------