अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर एकूण १७१ जागा

अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या आस्थापनेवर एकूण १७१ जागा

अंतिम तारिक 10th May 2018

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण १७१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

जिल्हा व्यवस्थापक /श्रेणी अधिकारी पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – कृषि पदवी

कनिष्ठ केंद्र अभियंता पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech (कृषि)

लेखापाल /अंतर्गत अंकेक्षक पदाच्या १ जागा
शैक्षणिक पात्रता – एम कॉम ३ वर्षाचा अनुभव

व्यवस्थापकीय संचालक यांचे स्विय सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी लघुलेखन (१२०) व इंग्रजी टंकलेखन (६०) तसेच ५ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदाच्या १ जागा
शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/ डिप्लोमा आणि 3 वर्षाचा अनुभव.

लघुलेखक ( निम्न श्रेणी) इंग्रजी पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी लघुलेखन (१२०) व इंग्रजी टंकलेखन (५०)तसेच ३ वर्षाचा अनुभव.लघुलेखक ( निम्न श्रेणी) मराठी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी लघुलेखन (८०) व मराठी टंकलेखन (४०) तसेच ३ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ पैदासकार पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – एम. एस्सी. (कृषि)

सहायक क्षेत्र आधिकारी पदाच्या ५४ जागा
शैक्षणिक पात्रता – बी. एस्सी. (कृषि)

आरेखक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि ३ वर्षाचा अनुभव.

माळी पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि माळी डिप्लोमा तसेच २ वर्षाचा अनुभव.

लिपिक-टंकलेखक पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन (४०) व मराठी (३०) तसेच २ वर्षाचा अनुभव.

प्रयोगशाळा सहायक पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी/ बारावी पास आणि कृषि डिप्लोमा तसेच ३ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ लिपिक-टंकलेखक पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन (४०) व मराठी (३०) आवश्यक.

कनिष्ठ प्रक्रिया सहायक पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि कृषि डिप्लोमा तसेच १ वर्षाचा अनुभव.

कनिष्ठ ऑपरेटर पदाच्या १२ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि आयटीआय (इलेक्ट्रिकल) तसेच १ वर्षाचा अनुभव.

शिपाई/ पहारेकरी पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी पास

वयोमर्यादा – १० मे २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250/-]

प्रवेशपत्र – 21 मे 2018 पासून उपलब्ध होतील.

ऑनलाईन परीक्षा – 10 आणि 11 जून २०१८ रोजी घेण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे २०१८

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org. Now send WHATSAPP message  (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------