व्यवसाय करणे व त्यातून आपली व देशाची उन्नती घडवून आणणे हा या काळाचा ‘युगधर्म’ आहे. मराठीमध्ये आपण ‘धंद्यात पडला’ असे म्हणतो. आता पडायची नव्हे तर उभे राहण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने आधार देऊ केला आहे.
• नवसृजन
'स्टॅन्डअप इंडिया' या योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमाती व महिला यांना शेतीबाह्य क्षेत्रात नवीन व्यवसाय स्थापित करण्यासाठी १० लाख ते १ कोटीपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येतो. पात्रता अशी आहे की, वय अठराच्या पुढे हवे. फक्त हरित क्षेत्र प्रकल्प (ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट्स) ना कर्ज दिले जाते. याचा अर्थ जे पहिल्यांदा उत्पादन किंवा सेवा किंवा व्यापार यांच्या व्यवसायात उतरत आहेत त्यांना कर्जपुरवठा केला जातो. जर कर्ज व्यक्तीला नव्हे तर उद्योगाला हवे असेल तर निदान ५१% समभाग अनुसूचित जाती/जमाती किंवा महिला उद्योजिकेच्या नावावर हवेत.
• प्रसार
प्रत्येक बँकेची शाखा, असे किमान दोन कर्ज वर्षभरात देईल. त्यातील एक अनुसूचित जाती/जमातीसाठी व दुसरे महिलेसाठी असेल. भारतातील १,२५,००० बँक शाखांची संख्या लक्षात घेता अडीच लाख उद्योजकांना कर्जवाटप करायचे लक्ष्य ठेवले आहे. स्टॅन्डअप इंडियाच्या संकेतस्थळावर प्रत्येक भाषेतील (मराठीसह) माहितीचा व्हिडीओ ठेवला आहे, हे
अजून एक पुढचे पाऊल.
• मुद्रा बँक
उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात अजून एक पुढचे पाऊल म्हणजे पुनर्वित्त करण्यासाठी विशेष संस्थेची निर्मिती. तिचे नाव आहे मुद्रा बँक (मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी बँकचे संक्षिप्त रूप) ही सार्वजनिक क्षेत्रातील एक वित्तीय संस्था म्हणून स्थापित केली आहे. ही कमी व्याज दरावर सूक्ष्म वित्तीय संस्था (MFI) आणि बिगर बँकिंग बँकिंग वित्तीय संस्थांना कर्जपुरवठा करते. या संस्था पुढे जाते लघुउद्योगांना (MSME) कर्ज देतात. • अवतारकार्य
ही बँक प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा भाग म्हणून निर्माण केली आहे. असे लघुउद्योग जे नेहमीच्या बँकांच्या परिघात येत नाहीत त्यांना शेवटच्या मैलातील प्रतिनिधीद्वारे (last mile agent) गाठणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अशा सुमारे साडेपाच कोटी लघुउद्योगांना लक्ष्य करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यापैकी फक्त ४ टक्के व्यवसायांना नेहमीच्या बँका कर्ज देतात. २०० कोटींचे भांडवल व शिवाय कर्जहमी निधी बाळगणारी ही बँक सुरुवातीला लघुउद्योग विकास बँकेची (सिडबी) शाखा म्हणून काम पाहिल. पुढे जाऊन तिचे स्वतंत्र कंपनीत रूपांतर करण्यात येईल.
• त्रिशूळ
मुद्रा बँकेने कर्ज क्षमतेनुसार ग्राहकांना तीन स्तरावर विभाजित केले आहे.
१. शिशु - ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज
२. किशोर - ५ लाखांपर्यंतचे कर्ज
३. तरुण - १० लाखांपर्यंतचे कर्ज
कर्ज घेण्यास पुढील प्रकारचे व्यायसायिक पात्र असतील. लघु उत्पादन उद्योग, दुकानदार, फळे व भाज्या विक्रेते, कारागीर. शिशु प्रकारच्या कर्जावर जास्त भर ठेवला आहे. या प्रकारच्या कर्जात भौतिक तारणावर भर देण्याऐवजी कारण (बिझनेस प्लॅन) बघितला जातो, त्यामुळे कर्ज मिळवणे तुलनेने सोपे आहे. याचा फायदा होऊन मोठ्या प्रमाणावर छोट्या कर्जाचे वितरण होते आहे. यात धोका आहे, असे वाटले जरी तो घेण्यासारखा आहे. ज्यांना पळून जायचे होते (विजय मल्ल्या) ते आधीच पळून गेले आहेत. आता मागे उरले आहेत ते खरेखुरे उत्सुक आहेत. मागच्या वर्षीचे १.२२ लाख कोटींचे कर्जवितरणाचे लक्ष्य साध्य केल्यामुळे यंदा लक्ष्य दुप्पट करीत २.४४ लाख कोटी इतके
ठेवले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------