MPSC

उग्रवादी डाव्या चळवळींसाठी ‘समाधान’ सूत्रे

भारतातील डाव्या चळवळींची सुरुवात नक्षलवादाच्या स्वरूपात पश्चिम बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्य़ातून झाली. सन १९६७ पासून या चळवळीमध्ये तिचे उद्देश, कारवाया व स्वरूप यांमध्ये बदलत्या काळानुसार बदल होत गेले. सध्या या नक्षलवादी चळवळीने उग्रवादी डाव्या चळवळीचे (Left Wing Extremism / Left wing terrorism – LTE) स्वरूप घेतले आहे. या चळवळीस आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तसेच संबंधित राज्य शासनाकडून बरेच प्रयत्न आजवर करण्यात आले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून समाधान (SAMADHAN) हा बहुसूत्री उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची माहिती या लेखामध्ये देण्यात येत आहे.

माओवादी हिंसेने त्रस्त असलेल्या १० राज्यांचे मुख्यमंत्री आणि पोलीस प्रमुख यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासमवेत आढावा बठक घेतली. मे २०१७ मध्ये झालेल्या या बैठकीत एका एकीकृत कमानीचे गठन करण्यात आले आहे. उग्रवाद व हिंसाचाराशी लढा देण्यासाठी आठ सूत्री कार्यक्रम ‘समाधान’चा तयार करण्यात आला आहे. समाधान सिद्धांताची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे :

हा (SAMADHAN) सिद्धांत म्हणजे आठ सूत्रांचे संक्षिप्त प्रारूप आहे. यातील सूत्रे पुढीलप्रमाणे :

S – Smart Leadershi (कुशल नेतृत्व)

दूरदृष्टी, आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि आवश्यक योजकता (Vision, Self belief, Mission and Passion) अशा चार गुणांनी युक्त नेतृत्व विकसित व उपयोजित करणे.

A – Aggressive strategy

(आक्रमक रणनीती)-  हिंसाचाराच्या घटना घडल्यावर त्यावर प्रतिक्रियात्मक कार्यवाही करण्याऐवजी स्वयंप्रेरित कार्यवाही करणे व त्यामध्ये आक्रमकता आणणे. रणनीती, सुरक्षा दलांचे उपयोजन, हिंसाचारविरोधी कार्यवाही, विकास आणि रस्ते बांधणी या क्षेत्रांमध्ये आक्रमकता आणणे. संबंधित राज्य सरकारे, सुरक्षा दले आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय अधिकारी यांच्यामध्ये कारणांची एकसंधता आणि कार्यवाहीची एकसंधता साधणे.

M – Motivation and training

(प्रेरणा आणि प्रशिक्षण)-  सुरक्षा दलांच्या शिबिरांना वीजपुरवठा, पाणीपुरवठा आणि दळणवळणाची साधने उपलब्ध करून देणे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्थानिक भाषा, बोली, परंपरा आणि संस्कृती यांची माहिती करून देणे जेणेकरून त्यांना स्थानिकांचा   विश्वास जिंकता येईल.

A- Actionable Intelligence

(कार्यवाहीयोग्य गुप्तहेरी) – समर्पण केलेल्या नक्षलवाद्यांकडून / डाव्या उग्रवाद्यांकडून चळवळीबाबत माहिती काढून घेणे. सर्व सुरक्षा दले आणि गुप्तहेर यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय साधणे, सार्वत्रिक सेवा दायित्व निधी (Universal Service Obligation Fund)िच्या माध्यमातून रेड कॉरिडॉरमध्ये संपर्क यंत्रणा स्थापन करणे, गुप्तहेर आणि छद्म खबरे अधिकारी (Shadow Intelligence Officers) यांचे उपयोजन, गुप्त माहितीच्या आदानप्रदानाची यंत्रणा स्थापन करणे.

D – Dashboard based key performance indicators and key result areas

– सर्व संबंधित अधिकाऱ्याचे मूल्यांकन करण्यासाठी प्रमुख कार्य निर्देशक (Key Performance Indicators) आणि मुख्य निष्पत्ती निर्देशांक (Key Result Areas) यांचा आधार घेणे.

H – Harnessing Technology

(तंत्रज्ञानाचा वापर) – मानवरहित हवाई वाहनांचा वापर (Unmanned Aerial Vehicle – UAV), स्मार्ट मशीन गन्समध्ये बायोमेट्रिक ट्रीगर्स, स्फोटक पदार्थामध्ये युनिक आयडेंटीफिकेशन क्रमांक इत्यादींचा वापर.

A – Action Plan for each Theatre

(प्रत्येक स्तरासाठी कार्ययोजना) – सर्व राज्यांसाठी एकच एक कार्ययोजना वापरणे व्यवहार्य नसल्याने ज्या त्या ठिकाणच्या समस्येनुसार आवश्यक ती कार्ययोजना तयार करण्यावर भर. यामध्ये तत्कालीन, मध्य व दीर्घ कालावधीसाठीच्या योजनाही आवश्यकतेनुसार बदल करून तयार करणे व राबविणे.

N – No access to Financing

(वित्तपुरवठा रोखणे) – उग्रवादी संघटनांना होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करणे.

आनुषंगिक मुद्दे

सध्या उग्रवादी डावी चळवळ देशातील १० राज्यांमध्ये व्यापली आहे. या चळवळीने ग्रस्त प्रदेश हा देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास ४० टक्के इतका आहे. यामध्ये बिहारचे २२ जिल्हे, झारखंडचे २१जिल्हे, ओदिशाचे १९ जिल्हे, छत्तीसगढचे १६ जिल्हे, तेलंगणा व आंध्र प्रदेशचे प्रत्येकी ८ जिल्हे, पश्चिम बंगाल व महाराष्ट्राचे प्रत्येकी ४ जिल्हे, उत्तर प्रदेशातील ३ व मध्ये प्रदेशाचा १ जिल्हा असे १०६ जिल्हे समाविष्ट आहेत. या संपूर्ण प्रदेशाचे क्षेत्रफळ सुमारे ९२,०००वर्ग किलोमीटर इतके आहे. या प्रदेशास ‘ रेड कॉरिडॉर ‘ म्हणून ओळखले जाते.

 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------