संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास लक्ष्यांमध्ये भूक आणि कुपोषणाचे निर्मूलन हा मुद्दाही समाविष्ट आहे. भारतामध्ये काही प्रदेशांमध्ये आजही तीव्र कुपोषण आणि भूकबळींचे प्रमाण लक्षणीय आहे. या अनुषंगाने शासनाकडून तसेच विविध संस्थांकडून भूकमुक्ती आणि पोषणासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यातील दोन महत्त्वाच्या उपक्रमांबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.
झिरो हंगर कार्यक्रम
भारतातील भूकबळींचे प्रमाण पाहता भारत भूकबळीमुक्त करण्यासाठी सन २०३०पर्यंतची मुदत शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये निश्चित करण्यात आली आहे. यासाठी जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने दि.१६ ऑक्टोबर २०१७ रोजी भारताच्या झिरो हंगर कार्यक्रमाची (शून्य भूक कार्यक्रम) सुरुवात करण्यात आली. याबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे
हा कार्यक्रम भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि जैव तंत्रज्ञान संशोधन साहाय्य परिषद (BIRAC) यांच्या साहाय्याने सुरू करण्यात आला आहे. यामध्ये संबंधित जिल्ह्य़ांच्या राज्य शासनांचेही आवश्यक योगदान यामध्ये असणार आहे.
गोरखपूर (उत्तर प्रदेश), कोरापूट (ओडीशा) आणि ठाणे (महाराष्ट्र) या तीन जिल्ह्य़ांपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या तीन जिल्ह्य़ांमध्ये शून्य भूक हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. त्यानंतर या जिल्ह्य़ांचे प्रारूप इतर जिल्ह्य़ांमध्ये भूकबळींपासून मुक्तता करण्यासाठी वापरण्यात येईल.
प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये पोषणाविषयक समस्या, उपयुक्त कृषी/ फलोद्यान आणि पशुपालनाच्या माध्यमातून त्यांवरील उपाय शोधणे या हेतूने गहन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सुपोषणासाठी कृषी प्रणाली संघटना स्थापन करणे तसेच पोषणमूल्य वृद्धी केलेल्या पीके व फळबागांसाठी उद्यानांची स्थापना करणे आणि संबंधित जिल्ह्य़ांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे यासाठी संबंधित राज्य शासन साहाय्य उपलब्ध करून देईल.
पीके व फळझाडांची पोषणमूल्य वृद्धी (Bio fortified Crops)
International food Policy Research Institute (IFPRI) कडून जाहीर झालेल्या जागतिक भूक निर्देशांक, २०१७ मध्ये भारताचा ९७ वा क्रमांक आहे. तर निती आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या, भारतातील गर्भवती महिला तसेच बालकांच्या कुपोषणाशी संबंधित आकडेवारीतूनही याबाबत जास्त गांभीर्याने आणि व्यापक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले आहे.
कुपोषणावर मात करण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांच्या समांतर असा पिके व फळझाडांची पोषणमूल्य वृद्धी करण्याबाबतचा (Bio Fortified Crops) उपक्रम भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) कडून हाती घेण्यात आला आहे. सन २००२ मध्ये सर्वप्रथम भाताची पोषणमूल्य वृद्धी करण्याचा कार्यक्रम केंद्रीय जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने हाती घेण्यात आला. या माध्यमातून भातपिकामध्ये लोह, िझक आणि
प्रो व्हिटॅमिन ए यांचे प्रमाण वाढविण्यात तर स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले. सन २००३ पासून आंतरराष्ट्रीय गहू व मका विकास केंद्राच्या मदतीने या दोन पिकांच्या पोषणमूल्य वृद्धीसाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. सध्या कउअफ कडून उच्च प्रथिनयुक्त भात, उच्च झिंकयुक्त भात, उच्च िझक आणि लोहयुक्त गहू, ट्रीप्टोफॉन आणि लायसिन या अमिनो अॅसिडयुक्त मका यासहित एकूण १२ बायो फोर्टीफाइड पिके विकसित करण्यात आली आहेत.
पोषणमूल्य वर्धित पिके (Bio fortified Crops)
बायो म्हणजे जीव / जैव आणि फोर्टीफिकेशन म्हणजे मजबुतीकरण. पिकांचे विविध पोषणमूल्यांनी मजबूतीकरण करणे म्हणजे बायो फोर्टीफिकेशन. यामध्ये पिकांचे पोषणमूल्य वाढविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने प्रयत्न करण्यात येतात. जैव अभियांत्रिकीचा वापर करून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने विविध पिकांमध्ये आवश्यकतेनुसार पोषणमूल्यांमध्ये वाढ करण्यात येते. उदाहरणार्थ छत्तीसगढसारख्या राज्यामध्ये मृदेतच िझकचे प्रमाण कमी असल्याने तेथील पिकाममध्ये झिंकचे प्रमाण कमी असते. या ठिकाणी उच्च िझकयुक्त भाताची लागवड उपयुक्त ठरते. याप्रमाणे स्थानिक लोकांच्या पोषणाशी संबंधित कमतरता आणि तेथील मृदा, पाणी यांचे गुणधर्म लक्षात घेऊन पिकांमध्ये आवश्यकतेनुसार प्रथिने, व्हिटॅमिन्स तसेच इतर पोषक खनिजांचे प्रमाण वाढविणे म्हणजे पिकांचे बायो फोर्टीफेकशन करणे. ICAR चे महासचिव त्रिलोचन महापात्रा यांच्या मते पोषणमूल्य वíधत पिके हा भारतातील कुपोषणाच्या समस्येवरील सर्वात प्रभावी उपाय आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------