MPSC

विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा – सामान्य अध्ययन

आज आपण विक्रीकर निरीक्षक पदासाठी असलेल्या वेगळ्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करावी हे पाहूयात.

अभ्यासक्रम व अभ्यास स्रोत

१) नियोजन – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये नियोजनाची प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आर्थिक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४ वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.

२) शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ – जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनिसारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी) दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार) रेडीओ, टी.व्ही. इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे

धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ. डी. आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशिलता यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.

३) आर्थिक सुधारणा व कायदे – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पाश्र्वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर VAT, WTO इत्यादीशी संबंधित कायदे/नियम यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.

४) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, विदेशी भांडवलाचा अंत:प्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था, IMF, जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग या संदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.

५) सार्वजनिक वित्त व्यवस्था – या घटकावर साधारणपणे ८ ते १० प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील  करसुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोशीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोशीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा यासंदर्भातील प्रश्नांचा समावेश होतो.

अभ्यास स्रोत – वरील घटकांसाठी भारताची व महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धापरीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.

विद्यार्थी मित्रांनो विक्रीकर निरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास नेमका कसा आणि कशातून करायचा याची यथासांग चर्चा आपण केलीच आहे. या मुख्य परीक्षेला सामोरे जाताना शेवटच्या घटकेतील उजळणी करणे गरजेचे आहे. ही उजळणी अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे केल्यास त्याचा पेपर सोडविताना नक्कीच फायदा होईल. मुख्य परीक्षेला अजून जवळपास दोन महिने बाकी आहेत. तर या दोन महिन्यातील अभ्यासासाठी खालील काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊन आपली रणनीती बनवा.

१) अभ्यासाचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त सराव चाचण्यांच्या माध्यमातून आपले आत्मपरीक्षण करा.

२) आपले कच्चे दुवे हेरून त्यांचा योग्य तो सराव करा.

३) आपले पक्के मुद्दे अधिक पक्के करा ज्यायोगे ऋणात्मक गुणपद्धतीला यशस्वीपणे सामोरे जाऊ शकाल.

४) अर्थशास्त्रातील विविध मूलभूत संकल्पना समजून घेऊन त्या लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.

५) शेवटी भरपूर सराव आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.

परीक्षेसाठी हार्दकि शुभेच्छा..!!

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------