MPSC

कृषी विज्ञान आणि कृषी अभियांत्रिकीचा आढावा

मुख्य  परीक्षेतील वैकल्पिक विषय-कृषी व कृषी अभियांत्रिकी यांच्याविषयी आपण जाणून घेऊ या.

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोन

(एक अनिवार्य व एक वैकल्पिक)

 

परीक्षार्थीना कृषी विज्ञान अनिवार्य विषयाबरोबर कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी या दोन विषयांमधून एकाची वैकल्पिक विषय म्हणून निवड करावी लागते.

*   मुख्य परीक्षा वैकल्पिक विषयांचा अभ्यासक्रम

अभ्यासक्रमातील प्रमुख घटक येथे देत आहोत. संपूर्ण अभ्यासक्रमासाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

पेपर २ (वैकल्पिक)

*   कृषी

१) कृषी वनस्पतीशास्त्र

मॉफॉलॉजी, अ‍ॅनॉटॉमी, स्फायटोजेनेटिक्स, जेनेटिक्स

*   पीक पदास

भारतातील बियाणेविषयक कायदे, बियाणे उत्पादन तंत्रज्ञान, पीक पदासीची नवीन साधने उदा. टिश्यू कल्चर, फोटोप्लास्ट फ्यूजन

*   प्लॅन्ट फिजिऑलॉजी

पेशींचे ऑसमॅटिक गुण आणि परस्पर संबंध, दुष्काळ प्रतिकारक्षमता.

*   सामाजिक वनीकरण :

औषधी आणि सुगंधी वनस्पती

पर्यावरणीय विज्ञान आणि कृषी पर्यावरणशात्र

*   वनस्पती जैव तंत्रज्ञान

२) पीक संरक्षण

*   कीटकशास्त्र (इन्टॉमॉलॉजी)

कीड व्यवस्थापन, कीड नियंत्रण पद्धती, कीटकनाशकांचा परिणाम

महत्त्वाच्या बातम्या

बीकेसीतील कर्मचाऱ्यांची कामाची वेळ बदलणार?

'चीनसमोर उभे राहण्याचे धाडस करणारे मोदी हे जगातील एकमेव नेते'

...आणि मी संघाचा कर्णधार झालो, महेंद्रसिंह धोनीने उलगडलं गुपित

Beauty Tips : हिवाळ्यात अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

..म्हणून मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई खावी

धोकादायक! समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे मुंबईसमोर संकट; नासाचा अहवाल

बीकेसीतील कर्मचाऱ्यांची कामाची वेळ बदलणार?

'चीनसमोर उभे राहण्याचे धाडस करणारे मोदी हे जगातील एकमेव नेते'

...आणि मी संघाचा कर्णधार झालो, महेंद्रसिंह धोनीने उलगडलं गुपित

Beauty Tips : हिवाळ्यात अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

PrevNext

*   प्लॅन्ट पॅथॉलॉजी

विकास, रोग प्रतिकार, सिम्टॉमॉलॉजी, वनस्पती रोग व नियंत्रण

३) फलोत्पादन

फळे, भाज्या, फुले लागवड, काढणीपश्चात, व्यवस्थापन आणि प्रक्रिया

४) शेतीविषयक प्रसार – ग्रामीण समाजशास्त्र, समुदाय विकास, शैक्षणिक प्रसार, प्रशासकीय प्रसार आणि कार्यक्रम मूल्यांकन

५) कृषी अर्थशास्त्र

भारतीय अर्थव्यवस्थेतील कृषीचे स्थान, समस्या, पंचवार्षिक योजना, नवीन कृषी धोरण, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना.

६) पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

७) अन्न विज्ञान

*   कृषी अभियांत्रिकी

१) शेतीतील कार्यशक्ती आणि शेतकी यंत्रे

*   शेतीतील कार्यशक्ती

मानवी, प्राणी आणि विद्युत शक्ती

*   कृषी ट्रॅक्टर्स

मशागत, लावणी आणि काढणी (हार्वेसिंग) यंत्रणा.

२) कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी

कृषी सामुग्री हाताळणे, दुग्ध आणि अन्न अभियांत्रिकी

३) विद्युत आणि इतर उर्जा स्रोत

वीज, सौरऊर्जा, पवनउर्जा, बायोगॅस एनर्जी

४) शेत संरचना

५) माती आणि जलसंवर्धन अभियांत्रिकी

६) सिंचन आणि निचरा (ड्रेनेज) अभियांत्रिकी

सिंचन पद्धती, कालवा सिंचन, जमिनीचा विकास

२०१६ च्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण

विषय  : कृषी

विषय : कृषी अभियांत्रिकी

 

वरील विश्लेषणावरून कृषी व कृषी अभियांत्रिकी या पेपर २ मधील प्रश्नांची घटकनिहाय गुण विभागणी आपल्याला दिसून येते. खाली दोन्ही विषयांतील अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मुद्दय़ांचे विश्लेषण केलेले आहे.

१) कृषी – क्लोिनग,  C3 C4 आणि CAM पिकांची वैशिष्टय़े व उदाहरणे, पिकांच्या जाती, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सूक्ष्म पोषकद्रव्ये व अन्नधान्यातून मिळणारी जीवनसत्त्वे, जनुकीय नियमन, कृत्रिम वाण आणि संमिश्र वाण, वनस्पती पोषण, कबरेदकांमध्ये चयापचय क्रिया, कृषी वनीकरण, प्रदूषण-प्रकार, वर्गीकरण,

कारणे आणि उपाय, नैसर्गिक संसाधने

आणि त्यांचे संवर्धन, वनस्पती आणि रोग, कीटकनाशके, कीड प्रतिकारात जैवतंत्रज्ञानाची भूमिका भाज्या, फुले व फळ भाजीपाला

यांची लागवड व संरक्षण, त्यांच्या साठवणूक

पद्धती, ग्रामीण समाज-संस्कृती व शिक्षण,

कृषीतील आंतरराष्ट्रीय कल, गॅट परिणाम/ WTO. शासकीय योजना व कार्यक्रम यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

२)  कृषी अभियांत्रिकी – या विषयात मानवी, प्राणी व यंत्राद्वारे केले जाणारे शेतीतील कार्य, कृषी टॅक्टर, पॉवर टिलर, हायड्रॉलिक प्रणाली, मशागतीची यंत्रणा, बियाणे आणि वनस्पतीच्या लावणी पद्धती, धान्य पेरण्याची यंत्रे, पीक काढणीच्या पद्धती, स्पेअर पंप, नॉझल आणि त्यांचे प्रकार, पिकांची वाळवणी, कृषी सामुग्री- पारंपरिक, यांत्रिक, फलोत्पादन प्रक्रिया, स्टोरेज संरचना, दुग्धजन्य पदार्थ व साठवणूक पद्धती, कोल्ड स्टोरेज, सौरऊर्जा वापर, विद्युत मोटर्स काळजी व देखभाल, बायोगॅस प्लॅन्टच्या विविध पद्धती, माती आणि जलसंवर्धन, जमिनीची धूप नियंत्रण, पूर नियंत्रण, पाणलोट व्यवस्थापन, शेत तलाव, पाझर तलाव, पावसाच्या पाण्याची साठवण, ठिबक व उपसा सिंचन या घटकांवर परीक्षार्थीनी विशेष लक्ष द्यावे.

संदर्भ सूची –

१) कृषी

*  प्रिन्सिपल ऑफ अ‍ॅग्रॉनॉमी – रेड्डी

*  राज्य परीक्षा मंडळाची अ‍ॅग्रीकल्चर आणि टेक्नॉलॉजीची ११ वी व १२ वीची पुस्तके

*  पर्यावरण  – शंकर आयएएस अ‍ॅकॅडमी

*  टॉपर्स नोटस्- सुभाष यादव, सचिन सूर्यवंशी

*  जनरल अ‍ॅग्रीकल्चर – मुनीरजी सिंग

*  अ कॉम्पेटिटिव्ह बुक ऑफ अ‍ॅग्रीकल्चर – नेमराज सुंदा

*  भारतीय अर्थव्यवस्था  – दत्त आणि सुंदरम

२) कृषी अभियांत्रिकी

*  अ‍ॅग्रीकल्चर इंजिनीअिरग –   भाग १ व २ – मिचेल अ‍ॅण्ड ओझा

*  ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ‍ॅग्रीकल्चर  इंजिनीअिरग – प्रीतम चंदा

*  लोकराज्य, योजना मासिके

*  करंट ग्राफ वार्षिक

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------