Yojana

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान

गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संपूर्ण देशात पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे.

अभियानाची उद्दिष्टे

देशातील ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी, सहजसाध्य, गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य निर्देशक व संसाधन यांमध्ये मागे असलेल्या १८ राज्यांवर विशेष लक्ष.

योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे व सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे यासाठी आरोग्य यंत्रणेच्या संरचनेत बदल करणे.

परंपरागत उपचारपद्धतीचे पुनर्जीवन आणि ‘आयुष’चा सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या मुख्य प्रवाहात समावेश करणे.

आरोग्य, पोषण, स्वच्छ पाणीपुरवठा, स्त्री-पुरुष समानता इ.च्या समावेशासह जिल्हा स्तरावर विकेंद्रीकरण पद्धतीने आरोग्य सेवेचे प्रभावी एकत्रीकरण.

ग्रामीण भागातील जनतेस, विशेषत: गरीब स्त्रिया व बालके यांना सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे.

आरोग्य पायाभूत मांडणी

जिल्हा आरोग्य समिती सर्व जिल्हय़ांमध्ये स्थापन करण्यात आले आहे.

कार्यक्रम पद्धत

सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या कार्यक्षमतेसाठी व त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पंचायत संस्थांना प्रशिक्षण देऊन स्वायत बनविणे.

महिला आरोग्य कार्यकर्त्यां(आशा)मार्फत घराघरापर्यंत सुधारलेल्या आरोग्य सेवांचा वापर वाढविणे.

ग्रामपंचायतीतील गाव आरोग्य समितीमार्फत गावाचा आरोग्य आराखडा तयार करणे.

उपकेंद्राचे स्थानिक नियोजन करण्यासाठी सक्षम करणे आणि बहुउद्देशीय कार्यकर्त्यांची उपलब्धता वाढविणे.

प्राथामिक आरोग्य केंद्र व सामाजिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण करणे आणि प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे ३० ते ५० रुग्ण बेडची क्षमता असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून आजारावर उपचार करून आरोग्यदायी जीवनासाठी प्रयत्न करणे.

जिल्हा आरोग्य अभियानांतर्गत एकत्रित जिल्हा आरोग्य आराखडा तयार करणे व त्याची अंमलबजावणी करणे .

अधिक माहितीसाठी

https://www.nrhm.maharashtra.gov.in/Default.aspx

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------