Yojana

राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात लोकसंख्यावाढीच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रम राबविला जातो. साहाय्यक अनुदान योजना ही सदर कुटुंबकल्याण कार्यक्रमाचाच एक भाग असून ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत आहे.

अंमलबजावणी पद्धती

लाभार्थीने स्वेच्छेने कुटुंबनियोजन पद्धत स्वीकारणे.

समाजाच्या गरजेनुसार सेवा देणे.

जोडप्याला त्यांच्या इच्छेनुसार हवी तेव्हा अपत्य प्राप्ती.

आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत लाभार्थ्यांचे संततिनियमनाच्या उपलब्ध पद्धतीविषयी समुपदेशन केले जाते. त्यानुसार लाभार्थी उपलब्ध पद्धतीमधून योग्य पद्धतीची निवड करतो. सध्या केंद्र शासन प्रसूतीपश्चात कुटुंबनियोजन सेवांवर अत्याधिक भर देत आहे.

कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या सेवांमध्ये कायमच्या पद्धती व तात्पुरत्या पद्धती असे दोन प्रकार आहेत. कायमच्या पद्धतीमध्ये पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो. स्त्री शस्त्रक्रियांमध्ये टाक्याच्या व बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी, गर्भनिरोधक गोळ्या व निरोध यांचा वापर केला जातो.

कार्यपद्धती

राष्ट्रीय कुटुंबकल्याण कार्यक्रमांतर्गत राज्यात नागरी आरोग्य केंद्रे, नागरी कुटुंब कल्याण केंद्रे, सहायक परिचारिका प्रसाविका प्रशिक्षण केंद्रे या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या संस्था महानगरपालिका व नगरपालिका कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. हा कार्यक्रम राबविण्यासाठी स्थानिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असतो.

या कार्यक्रमामध्ये प्रत्येक नागरी आरोग्य केंद्र व नागरी कुटुंबकल्याण केंद्र यांना लोकसंख्येचे कार्यक्षेत्र ठरवून दिले जाते, मात्र नागरी आरोग्य सुविधा योजनांतर्गत मंजूर केलेल्या केंद्रास त्यांच्या लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकसंख्या झोपडपट्टी अथवा तत्सम भागातील असणे आवश्यक असते. या कार्यक्षेत्रातील लोकांना कुटुंबकल्याण कार्यक्रम सेवा तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत दिली जाते.

उद्दिष्ट

लोकसंख्यावाढीवर नियंत्रण व लोकसंख्या स्थिरतेस साहाय्य करणे.

अधिक माहितीसाठी : http://arogya.maharashtra.gov.in/

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------