Yojana

महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची प्रयोगशाळा

विविध प्रायोजित संशोधन आणि विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे.

उद्दिष्टे

पाणी, सांडपाणी, हवा, जैव-वैद्यकीय कचरा, घातक कचऱ्याचे नमुने इत्यादींचे विश्लेषण करणे

पर्यावरणीय नमुने, संयुक्त सतर्कता नमुने आणि कायद्याच्या पुराव्याचे नमुने असे वर्गीकरण करणे.

विविध प्रायोजित संशोधन आणि विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे.

प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि सार्वजनिक जागरूकता या क्षेत्रांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील हिताच्या विशेष क्षेत्रांमध्ये योजना आखणे आणि संशोधन, तपास आणि विकासात्मक प्रकल्प आयोजित करणे.

मंडळाच्या वैज्ञानिक कर्मचारीवर्ग प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण

पाण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करणे या चाचणीचा अहवाल मंडळाकडे पाठवणे.

पाण्याच्या नमुन्यांचा संग्रह करणे.

मंडळाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीने त्याला दिलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करणे आणि त्याचे परिणाम त्या व्यक्तीला कळविणे.

याच पद्धतीने वायूप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण केले जाते.

पर्यावरण संरक्षण

विविध पर्यावरणीय प्रदूषकांचा नमुना बनविणे आणि विश्लेषण यांच्यासाठी प्रमाणित पद्धती निर्माण करणे.

अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या नमुन्यांचे विश्लेषण करणे.

स्थापित केलेल्या मानकांवर निरीक्षण ठेवण्यासाठी आणि त्यांना लागू करण्यासाठी पर्यावरणाची गुणवत्ता आणि पर्यावरणात्मक प्रदूषके यांच्यासाठी मानके प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने निर्देशित केल्यानुसार असे तपास करणे.

कामाच्या संदर्भातील अहवाल, माहिती केंद्र सरकापर्यंत पोहोचविणे.

केंद्र सरकारद्वारा वेळोवेळी सोपविलेल्या अशा अन्य कार्याची पूर्तता करणे.

अधिक माहितीसाठी :  http://www.mpcb.gov.in/marathi/aboutus/labfunction12.php

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------