Yojana

‘इस्रो’ मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप

‘इस्रो’ म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिपची संधी खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत.

जागांची संख्या – ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी उपलब्ध जागांची संख्या २० आहे.

आवश्यक पात्रता –

अर्जदारांनी अप्लाइड ऑप्टिक्स, ऑप्टिकल इंजिनीअरिंग, फोटोनिक्स, लेसर अ‍ॅण्ड इलेक्ट्रो ऑप्टिकल इंजिनीअरिंग, ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, ऑप्टिकल कम्युनिकेशन, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, मायक्रो- इलेक्ट्रॉनिक्स, सिग्नल प्रोसेसिंग, थर्मल इंजिनीअरिंग, थर्मल सायन्स, एनर्जी सिस्टिम्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मटेरियल्स इंजिनीअरिंग, मटेरियल सायन्स, मेटॅलर्जीकल इंजिनीअरिंग, नॅनो टेक्नॉलॉजी, भौतिकशास्त्र, अप्लाइड फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या विषयातील एमई, एमटेक वा एमएससी पात्रता कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व त्यांनी खालीलपैकी कुठलीही एक पात्रता परीक्षा दिलेली असावी.

सीएसआयआर-यूजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट ‘नेट’- लेक्चरशीप पात्रता.

‘गेट’- ग्रॅज्युएट अ‍ॅप्टीटय़ूड टेस्ट इन इंजिनीअरिंग.

‘जॅम’ जॉइन्ट अ‍ॅडीमिशन टेस्ट.

‘जेस्ट’ जॉइन्ट एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट.

वयोमर्यादा- अर्जदारांचे वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची शैक्षणिक पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व संबंधित पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे ‘इस्रो’तर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी निवड करण्यात येईल.

फेलोशिपचा कालावधी व रक्कम- योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ‘इस्रो’तर्फे दोन वर्षे कालावधीसाठी ज्युनिअर रिसर्च फेलो म्हणून नेमण्यात येईल. या कालावधीत त्यांना दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप व नियमानुसार घरभाडे भत्ता देय असेल.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क – वरील संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इस्रोची जाहिरात पहावी अथवा  इस्रोच्या http://www.isro.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावरील http://www.isac.gov.in/JRFME-2017/advt.jsp या लिंकमध्ये याविषयीची सविस्तर माहिती मिळू शकेल.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर  अर्ज करण्याची शेवटची तारीख २ फेब्रुवारी २०१८ आहे. ‘इस्रो’सारख्या संस्थेत संशोधनपर काम करावयास मिळणे,ही एक उत्तम संधी आहे, विद्यार्थ्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.