Yojana

आरोग्य विभागाची कायापालट योजना

महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य संस्थांचे जाळे असून त्या माध्यमातून ग्रामीण जनतेला विशेषत: गरीब व जोखमीच्या लोकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यातील शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ, सुसज्ज व लोकाभिमुख करण्यासाठी संपूर्ण राज्यात ही योजना राबविली जाते.

राज्यातील ग्रामीण जनतेला विविध गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे राज्यातील रुग्णालयांचा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचा मोठा सहभाग आहे.

राज्यातील काही रुग्णालये दुरवस्थेत असल्यामुळे परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कमी पडत आहेत, असे सर्वसाधारण आढाव्याअंती राज्य शासनाच्या निदर्शनास आलेले आहे.

उद्दिष्टे

लोक/कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे.

राज्य शासनाच्या रुग्णालयातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे जनतेचा राज्य शासनाच्या आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे व सर्व सार्वजनिक आरोग्य सेवेकडे सर्वाना आकर्षित करणे.

शासकीय आरोग्य संस्थांमधून देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता व परिणामकारकता वाढविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे.

रुग्णांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाधान करणे.

शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसूतीचे प्रमाण वाढविणे.

शासकीय आरोग्य संस्थांमधील बाह्य़ रुग्ण व आंतररुग्णांची संख्या वाढविणे.

शासकीय आरोग्य संस्थांमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवून आणणे.

रुग्णांच्या तपासणीसाठी व आजारांच्या अचूक निदानासाठी प्रयोगशाळांची गुणवत्ता वाढविणे.

पोलीस स्टेशन असलेल्या ठिकाणी शवविच्छेदनाची सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे.

अधिक माहितीसाठी

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------