मराठी व्याकरण

व्याकरण - करुण रस

मानवी मनातील शोक किंवा दु:ख या स्थायी भावनेतून करुण रसाचा उगम होतो. ह्दयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनात हा रस आढळतो. कसल्यातरी हानीमुळे, वियोगामुळे किंवा संकटमय प्रसंगात (व्यक्ती हळवी होते आणि) हा रस निर्माण होतो.

Marathi Vyakaran करुण रस

उदाहरणे

 

  1. बाईच्या ओठाआड दडलेले असते रडणे.
    वर वर हसणे आणि आतल्या आत कुढणे

  2. ज्ञानोबा – आता तरी ताटी उघडा
    फार तिष्ठत ठेवले तुम्ही मुक्ताबाईला
    सातशे वर्ष झाली या प्रकरणाला
    आमच्यासाठी काही कसे जमले नाही तुम्हाला
  3. डोळ्यांतल्या डोळ्यात वाटा फिरतात,
    सरळ होतात, दूरदूर सरतात
    पोटातल्या हाका
    ओठातच बुडून जातात
  4. एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे l
    जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे l l
  5. आई म्हणोनि कोणी l आईस हक मारी l l
    ती हाक येई कानी l मज होय शोककारी l l
  6. लग्नाला तीन वर्ष होत नाहीत तोच नवरा तिच्याकडून
    घटस्फोट घेतो व तिला मुंबईला तिच्या आईवडिलांकडे पाठवून देतो
  7. झाला भुईचा दुष्मान दृष्ट दुष्काळ सारखा
    आटलेला हा पाऊस ढगा. जगाला पारखा
    माणसाच्या प्राक्तनाशी नित्य निसर्ग का खेळे?
  8. पत्र धाड वेळोवेळी l जप आपुल्या जीवास l l
    नाही मायेचे माणूस l l
  9. कितीतरी दिवसात
    नाही चांदण्यात गेलो
    किती तरी दिवसात
    नाही नदीत डुंबलो
  10. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
    आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
  11. जग हे बंदिशाळा l कुणी न येथे भला चांगला
    जो तो पथ चुकलेला l l
  12. तिने फुलाना आपली मुले बनविली होती 
    त्यांच्यावर आपल्या मातृत्वाची छाया धरली होती ... इथून 
    जाताना तिला काय वाटले असेल?... अन, त्या फुलझाडांनाही?