MPSC

अर्थशास्त्र - अर्थव्यवस्थेची ओळख

अर्थव्यवस्थेचा अर्थ आणि व्याख्या

लोकांच्या विविथ गरजा भागवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उत्पादक उपक्रमांचे एकत्रीकरण.

लोकांना रोजगार व उत्पन्नाची साधने पुरवणारी व्यवस्था.

वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करणारे संघटन.

व्याख्या

विशिष्ट भुप्रदेशातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, वितरण आणि पुरवठा यांच्याशी संबधित उपक्रम म्हणजे ‘अर्थव्यवस्था’ होय.

ऑक्सफर्डच्या मते अर्थव्यवस्था म्हणजे विशिष्ट देश/प्रदेशातील उत्पादन, व्यापार, वित्तपुरवठा यातील आंतरसंबंध.

अर्थव्यवस्थेचे प्रकार

उत्पादन साधनांचे स्वामित्व व व्यवस्थापन यांच्या आथारे अर्थव्यवस्येचे प्रमुख प्रकार खालील प्रमाणे.

भांडवलशाही अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साथनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो. उदा. अमेरिकन संघराज्ये

समाजवादी अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्येत उत्पादनाचे घटक एकत्रित रित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. उत्पादनाच्या साधनांचे स्वामित्व आणि व्यवस्थापन सरकारकडून केले जाते समाजाचे हित साथावे हा मुख्य हेतू असतो उदा. चीन.

मिश्र अर्थव्यवस्था:- या अर्थव्यवस्थेत सार्वजानिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह- आस्तित्व असते. उदा भारत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टये

भौगोलिक क्षेत्र – प्रत्येक अर्थव्यवरयेचे सुनिश्चित क्षेत्र व सीमा असतात भारताचे भौगोलिक क्षेत्रफळ ३२, ८७, २६३ चौ. किमी आहे प्रथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापेकी २.८ टक्के भूक्षेत्र भारताच्या ताब्यात आहे.

भारतात २९ राज्ये व ७ केंद्रशसित प्रदेश आहेत

नैसार्गिक साधन सामग्री

निसर्गाकडून विनामूल्य उपलब्ध झालेल्या भूमी, पाणी, जंगले, खनिज साठे यांचा समावेश नैसर्गिक साधन सामग्रीत करण्यात येतो.

अर्थव्यवस्थेची उत्पादन पातळी साधन सामग्रीची उपलब्धता आणि वापर यावर अवलंबून असेत.

लोकसंख्या

देशातील लोकसंखेच्या आकारमानावर श्रमपुरवठा अवलंबून असतो.

लोकसंख्येची गुणवत्ता शिक्षण प्रशिक्षण आणि आरोग्यसेवा यांच्याव्दारा सुधारता येते.

पर्याप्त लोकसंख्या आदर्श आकारमान दर्शवते

पर्याप्तपेक्षा अधिक लोकसंख्या म्हणजे अतिरिक्त लोकसंख्या होय त्यामुळे साधन संपत्तीवरील ताण वाढतो.

पर्याप्त लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या म्हणजे न्यून लोकसंख्या होय. यामुळे उपलब्ध साधन संपलीचा पर्याप्त वापर होत नाही.

सार्वभौमत्व

सार्वभौमत्व म्हणजे राज्यातील सर्वोच्च सत्ता किंवा अधिकार होय.

सरकारने कायदे करणे व त्यांची कार्यवाही करणे यासाठी सार्वभौम अधिकार आवश्यक असतात.

स्वंतत्र आणि सार्वभौम राष्ट्रच देशाच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासंबंधीचे निर्णय घेऊ शकते.

क्षेत्रीय विभाजन

उत्पादक उपक्रमांचे तीन क्षेत्रात वर्गीकरण केले आहे

प्राथमिक क्षेत्र:- याला कृर्षा क्षेत्र असेही म्हणतात नैरार्गिक साधन सामग्रीवर आधारीत व्यवसायांचा यात समावेश होतो.उदा. शेती आणि पशूपालन कुक्कुट पालन, मत्स्यव्यवसाय, जंगल व्यवसाय व खाणकाम भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत निम्यापेक्षा अधिक लोकसंख्या प्राथमिक क्षेत्राशी संलग्न आहे.

द्वितीय क्षेत्र:- याला औदयोगिक क्षेत्र असेही म्हणतात – यात कारखात दारी, बांधकाम, वीज, नै वायू पाणी पुरवठा इ व्यवसायांचा समावेश होतो.

तृतीय क्षेत्र:- याला सेवा क्षेत्र असेही म्हणतात यात वाहतूक, दळणवळण, बँका, विमाव्यवसाय, व्यापार, वित्त आरोग्य, शिक्षण, उपहार गृह, मनोरंजन यासारख्या सेवांचा समावेश होतो.

भारतात सध्या राष्ट्रीय उत्पादनातील व्दितीय व तृ तीय क्षेत्राचे योगदान वाढत आहे. भारताच्या आर्थिक विकासात वाढ होत आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------