MPSC

सामान्य विज्ञानाचा महत्त्वाचा घटक जीवशास्त्र

सामान्य विज्ञानाच्या दिलेल्या अभ्यासक्रमामध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण घटक म्हणजे जीवशास्त्र. त्यामध्ये प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र यांचा प्रामुख्याने समावेश होतो. मागील वर्षांच्या राज्यसेवा परीक्षेमध्ये तर थेट अभ्यासक्रमावरतीच प्रश्न विचारला गेला होता, की वरीलपैकी  कोणते शास्त्र उपयोजित शास्त्र नाही? त्यामुळे वरील तीन सद्धांतिक शास्त्रांबरोबरच आता सामान्य विज्ञान या विषयामध्ये जीवशास्त्र विभागात येत्या वर्षभरासाठी व त्यानंतर जीवशास्त्रामधील उपयोजित शास्त्रांची तोंडओळख ठेवावी लागणार आहे. या शास्त्राचे इंग्रजी नाव, त्यामध्ये होणारे अध्ययन इ. गोष्टींची माहिती आपल्याला ठेवावी लागणार आहे.

एम.पी.एस.सी.च्या इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये खूपच समतोल असल्याचे दिसून येते. सात्यत्यपूर्ण अभ्यास व प्रश्नाचे स्वरूप लक्षात घेतल्यास प्रश्न-पद्धती कशा स्वरूपाची आहे याचे आकलन होते. एमपीएससीने मागील २-३ वर्षांमध्ये

१) वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण पद्धती,

२) यांच्याशी संबंधित आजार/रोग,

३) पोषण पद्धती

यावर सर्वाधिक प्रश्न विचारले असल्याचे दिसून येते. म्हणून वरील तीन घटकांचा व्यवस्थित अभ्यास केला तर विज्ञानाच्या एकूण १५ प्रश्नांपैकी  ७-८ प्रश्न आपण सहज सोडवू शकता. यासाठी कोणत्याही विशेषज्ञानाची आवश्यकता नाही.

महत्त्वाच्या बातम्या

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीचे देशातून पलायन?

रुचकर : मेडिटरेनियन पाककृती

सेतू बांधा रे!

कॅन्सरमुळे अविवाहित मुलगा गेला, पण तंत्रज्ञानामुळे मिळाले दोन गोंडस नातू

असून अडचण आणि..

कोण आहे पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणारा नीरव मोदी?

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालणाऱ्या नीरव मोदीचे देशातून पलायन?

रुचकर : मेडिटरेनियन पाककृती

सेतू बांधा रे!

कॅन्सरमुळे अविवाहित मुलगा गेला, पण तंत्रज्ञानामुळे मिळाले दोन गोंडस नातू

PrevNext

४) आपण जीवशास्त्रांमध्ये सर्वाधिक वेळ देतो ते म्हणजे अवयव संस्था या विभागाला. एकूण अवयवसंस्थांचे आठ प्रकार व मागील वर्षांमध्ये केवळ ४ प्रश्न असे याचे स्वरूप आहे. म्हणून यांमधील केवळ वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्था, अवयवसंस्था एक वेळ काळजीपूर्वक वाचून प्रत्येक संस्थेवर किमान १०प्रश्न स्वत:हून लिहून काढावेत किंवा तयार करावेत. यामुळे आपल्या अवयवसंस्थेवरील येणारे प्रश्न कसे असतील याची कल्पना आपल्याला येऊ शकते.

५) सूक्ष्मजीव या विषयावर केवळ एकच प्रश्न विचारला जातो म्हणून विविध सूक्ष्मजीव त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक तक्ता तयार ठेवल्यास विचारला जाणारा एकमेव प्रश्न देखील तुम्ही लीलया सोडवू शकता.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील बहुसंख्य विद्यार्थी हे कला व वाणिज्य शाखेतील असल्यामुळे त्यांना विज्ञानातील संकल्पना समजायला वेळ लागतो. समजल्यास लक्षात ठेवायला अवघड जाते व संबंधित विषय अवघड वाटू लागतो. बाजारातील विविध लेखकाद्वारे लिहिल्या गेलेल्या पुस्तकांमध्ये कोणतीच सुसूत्रता नसते. म्हणूनही हा विषय अवघड वाटू लागतो. जीवशास्त्र विषय सोपा करून वाचायचा असेल तर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

१) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका

२) राज्य पाठय़ पुस्तकमंडळ यांची पुस्तके

मागील काही वर्षांमध्ये एमपीएससीच्या विज्ञान विभागामध्ये प्रश्नांची उत्क्रांती होत असल्यासारखे दिसून येते. मागील प्रश्नांमधील सलगता आपल्याला अभ्यास कशाचा करावा आणि किती करावा याची सीमादेखील आखून देते. म्हणून जीवशास्त्र विषयांचा अभ्यास करावयाचा असेल तर पुढीलप्रमाणे करायचा प्रयत्न करावा.

अ) वर्गीकरण

प्राणी/वनस्पती

वर्गीकरण म्हणजे काय?

वर्गीकरणाच्या पद्धती – शास्त्रज्ञ

विविध संच व विभाग यांचा प्राथमिक अभ्यास, यामधील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्टय़े इ. नववीच्या पुस्तकामधील जाती व प्रजातींची नावं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न

ब) आजार

प्राणी/वनस्पती

आजाराची कारणे – जिवाणू, विषाणू, कवक इ.

आजार/रोगाचे वाहक

लक्षणे

लसीकरण व उपचार

क) संस्था

प्राणी/वनस्पती

प्राण्यांमध्ये वनस्पतींपेक्षा जास्त व किचकट संस्था आहेत. म्हणून प्राणीसंस्थांवर जास्त भर द्यावे. या संस्था वाचून झाल्यानंतर वस्तुनिष्ठ बाबी लिहून काढावे.

ड) इतर

जैव विज्ञान विषयातील हक्काचे गुण मिळवून देणारा प्रश्न असेही आपण याला म्हणू शकतो. कारण प्रत्येक प्रश्न पत्रिकेमध्ये १५पैकी  एक प्रश्न हा हरीतगृह वायू व पर्यावरणीय हानिकारक घटक यांवर हमखास विचारलेला असतोच. याचा अभ्यास शालेय पुस्तकांमधूल केल्यास अति उत्तम.

वरील घटक अ,ब,क,ड सर्वासाठी शालेय पुस्तके सर्वोत्कृष्ट आहेत. वर्गीकरणासंबंधी विशेष अभ्यास करावयाचा असल्यास इ. अकरावीचे विज्ञानाचे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. मागील काही परिक्षांमध्ये यांमधून थेट प्रश्न देखील विचारले गेल्याचे आपल्याला दिसून येते. वरील सर्व घटकांच्या पाठांतराऐवजी संकल्पना वस्तुनिष्ठ बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करावा. विज्ञानामधील जुन्या सर्वमान्य संकल्पना, त्याचे निष्कर्ष बदलत नाहीत. म्हणूनच  काही नवीन बाबी सोडल्यास आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेले सद्धांतिक विज्ञान योग्य रीतीने समजून घ्या. असे केल्याने इतर विषयांपेक्षा सर्वाधिक गुण यामध्ये मिळू शकतात.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------