UPSC

जैवविविधता आणि पर्यावरण

सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ.

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर तीनमधील जैवविविधता आणि पर्यावरण या घटकाची चर्चा करणार आहोत. भारत हा जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या प्रदेशांपकी एक आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. परिणामस्वरूप भारतातील उपलब्ध नसíगक साधनसंपत्तीचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो आहे. परंतु याचा भारतातील पर्यावरण आणि जैवविविधतेवर नकारात्मक परिणाम होतो आहे. याचबरोबर आधुनिकीकरणाच्या युगात नसíगक साधनसंपत्तीवर मोठय़ा प्रमाणावर संकटे येत आहेत. त्यात शहरीकरण, वाढत जाणारी लोकसंख्या, जंगलाची होत असलेली तोड, नष्ट होत चाललेले वन्यजीवांचे अधिवास, जैविक संपत्तीचा अमर्याद वापर यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जैविक उत्पादने व साधनसंपत्तीवर अवलंबून असलेली लोकसंख्या तसेच एकूण जैवविविधतेच्या संपत्तीवर विपरीत परिणाम होत आहे. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच करणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात खूप मोठय़ा पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल. याचे गंभीर परिणाम जैवविविधता आणि पर्यावरण यांवर होऊ शकतात. या सर्व पलूंचे एकत्रित आकलन करून हा घटक अभ्यासावा लागणार आहे.

सर्वप्रथम आपण या घटकामध्ये नमूद असलेल्या मुद्दय़ांचा आढावा घेऊ. यात जैवविविधता आणि पर्यावरण याचे संरक्षण, पर्यावरणीय प्रदूषण आणि होणारा ऱ्हास, पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन इत्यादी मुद्दे आपणाला अभ्यासावे लागणार आहेत. पर्यावरण आणि जैवविविधतेचा होणारा ऱ्हास व या ऱ्हासासाठी जबाबदार असणारे घटक, जैवविविधतेला निर्माण झालेला धोका, पर्यावरणीय प्रदूषण, नदी प्रदूषण, हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व यामुळे उत्पन्न झालेल्या समस्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना, भारत सरकारमार्फत जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षित करण्यासाठी पास करण्यात आलेले विविध कायदे व त्यांची उपयुक्तता तसेच पर्यावरणसंबंधी करावयाचे पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन आणि हे का अनिवार्य करण्यात आलेले आहे तसेच याची नेमकी काय उपयुक्तता आहे, यासारख्या एकत्रित बाबींचा विचार करून या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारे नियोजन करावे लागणार आहे.

२०१३ ते २०१७ मध्ये प्रश्न विचारण्यात आलेले काही प्रश्न खालीलप्रमाणे होते –

अवैधरीत्या खाणकामामुळे काय परिणाम होतात? कोळसा खाण क्षेत्रासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या जा किंवा जाऊ नका (GO AND NO GO) या संकल्पनेची चर्चा करा. (२०१३)

जरी कार्बन क्रेडिट आणि स्वच्छ विकास प्रणाली यू. एन. फ. सी. सी. सी.च्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या असल्या तरी यातील कार्बन क्रेडिटच्या मूल्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण झालेली आहे अशा स्थितीतही हे चालू ठेवावे का? आíथक वृद्धीसाठी भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज या संदर्भात चर्चा करा. (२०१४)

नमामि गंगे आणि स्वच्छ गंगासाठीचे राष्ट्रीय मिशन (NMCG) कार्यक्रम आणि यापूर्वीच्या योजनापासून मिळालेल्या संमिश्र परिणामाच्या कारणावर चर्चा करा. गंगा नदीच्या संवर्धनासाठी कोणती मोठी झेप ही वाढीव योगदानाच्या अपेक्षेपेक्षा अधिक साह्यकारी होऊ शकते? (२०१५)

मोठय़ा प्रकल्पांचे नियोजन करताना मानवी वस्त्यांचे पुनर्वसन हा एक महत्त्वाचा पर्यावरणीय परिणाम आहे, ज्यावर नेहमीच वादविवाद होतो. विकासाचे मोठे प्रकल्प प्रस्तावित करताना हे परिणाम सुसह्य करण्यासाठी सुचविलेल्या उपायांवर चर्चा करा. (२०१६)

हवामान बदल ही एक जागतिक समस्या आहे. भारत हवामान बदलामुळे कशा प्रभावित होईल? हवामान बदलामुळे भारतातील हिमालयीन आणि समुद्रकिनारपट्टी असणारी राज्ये कशी प्रभावित होतील? (२०१७)

उपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारण्यात आलेले आहेत. संपूर्ण पेपर तीनचा विचार केल्यास या घटकावर अधिक प्रमाणात प्रश्न विचारले गेलेले नाहीत. तसेच हे प्रश्न विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा या घटकाशी संबंधित चालू घडामोडींचा विचार करून विचारण्यात आलेले आहेत. या घटकाची सखोल माहिती असल्याखेरीज हा घटक परीक्षेच्या दृष्टीने तयार करणे अवघड जाते. तसे या घटकाच्या पारंपरिक ज्ञानाची व्याप्ती अधिक विस्तृत आहे, पण उपरोक्त प्रश्नाचे विश्लेषण केल्यास आपणाला या घटकाचा अभ्यास नेमक्या कोणत्या पद्धतीने करावा याची दिशा मिळते. वरील प्रश्नामध्ये संकल्पना, तसेच संबंधित कार्यक्रम आणि त्यापासून झालेला फायदा आणि त्यांची जैवविविधता आणि पर्यावरण याचे संवर्धन करण्यासाठीची उपयुक्तता यांसारख्या पलूंचा मुखत्वे विचार केलेला दिसून येतो. तसे या घटकाचे स्वरूप सायंटिफिक पद्धतीचे आहे आणि यात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पनांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे.

या घटकासाठी नेमके कोणते संदर्भ वापरावेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. या घटकासाठी एन. सी. ई. आर. टी.ची पर्यावरणसंबंधित पुस्तके वाचावीत आणि बाजारात या घटकासाठी अनेक गाइड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील कोणतेही पुस्तक जे सोप्या पद्धतीने या घटकाची माहिती देईल ते वाचावे. उदाहरणार्थ, ळटऌ चे डी.आर. खुल्लर लिखित पर्यावरणाचे पुस्तक. तसेच इंडिया ईअर बुकमधील पर्यावरणाचे प्रकरण याचाही अभ्यास करावा. या घटकाचा चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी ‘द हिंदू’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ ही इंग्रजी दैनिके, योजना, कुरुक्षेत्र आणि डाऊन टू अर्थ ही मासिके तसेच पर्यावरण आणि वन मंत्रालय, जैवविविधता प्राधिकरण याच्या वेबसाइट्सचा वापर करावा आणि याच्या जोडीला भारत सरकारच्या आíथक पाहणी अहवालातील जागतिक तापमानवाढ आणि शाश्वत विकास हे प्रकरण अभ्यासावे. तसेच मराठीमध्ये या घटकाशी संबंधित चालू घडामोडींसाठी द युनिक अकादमीद्वारे प्रकाशित ‘भारत वार्षकि’मधील पर्यावरणासंबंधित चालू घडामोडींचे प्रकरण वाचावे. यापुढील लेखामध्ये आपण आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन या घटकाची चर्चा करणार आहोत.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------