History

आशिया आधुनिक इतिहासातील घटनाक्रम

वर्ष १४५३

कॉन्सटॅन्टीनोपलचा ऑटोमन तुर्कानी पाडाव केला.

युरोपियनांचा पूर्वेकडे जाण्याचा खुष्कीचा मार्ग बंद झाला युरोपियन देशांना पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी जलमार्ग शोधण्याची आवश्यकता भासू लागली.वर्ष १४९८

पोर्तुगीज खलाशी वास्को-दगामा भारताच्या कालिकत बंदरात पोहोचला. 

पोर्तुगीजांनी भारताबरोबर व्यापारी संबधी प्रस्थापित केले.

 

वर्ष १६००

ईस्ट इंडिया कंपनीला राणी एलिझाबेथ हिने पूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्याची परवानगी दिली. 

ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या पाश्चिम किनाऱ्यावर व्यापारासाठी वखारी स्थापन केल्या व भारतीयांचे शोषण केले.

 

वर्ष १७५७

प्लासीच्या लढाईतील इंग्रजांचा विजय. 

भारतात ब्रिटीश सत्तेची मुहूर्तमेढ रोवली व त्यानंतर लॉर्ड डलहौसी संस्थाने खालसा करण्याचे धोरण राबविले.

 

वर्ष १८५७

१८५७ चा उठाव उठाव ब्रिटिशांकडून दडवला गेला.

वर्ष १८५८

जाहिरनामा प्रसिदध करून इंग्लंडच्या राणीने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता बरखास्त केली. 

भारतातील सत्तेची सूत्रे इंग्लंडच्या पार्लमेंटकडे सोपविली गेली.

वर्ष १८८५

सेवानिवृत्त अधिकारी अॅलन अॅक्टन ह्यूम यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. 

ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरूदध आवाज उठविण्यासाठी पहिली अखिल भारतीय राजकीय संघटना स्थापन झाली.

 

वर्ष १८८५ ते १९०५

मवाळ नेत्यांचा कालखंड या कालखंडात मवाळ नेत्यांनी अर्ज विनंत्या या मार्गाने आपल्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न केला.

मवाळ नेत्यांनी भारतीय जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली व भारतीयांची राजकीय गाऱ्हाणी मांडून ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधले.

 

वर्ष १९०५ ते १९२०

जहालमतवादी विचारांचा कालखंड 

जहालमतवादी नेत्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतु:सुत्रीच्या माध्यमातून राजकीय जनजागृती घडवून आणली.

 

वर्ष १९११

१२ डिसेंवर १९११ रोजी ब्रिटीश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रदद केली.

१० नोव्हेबर १९११ मध्ये हॅमको येथील बॉम्ब स्फोटाने चीनमध्ये क्रांतीची सुरुवात झाली. 

कोमिंगटांग पक्षाला चीनच्या काही भागात वर्चस्व मिळाल्याने डॉ. सन-येत-सेन यांनी प्रजासत्ताकाची घोषणा केली व ते स्वतः अध्यक्ष झाले.

 

वर्ष १९१९

रौलट ॲक्ट पास केला. 

या कायदयाच्या विरोधात देशभर संतापाची लाट उसळली.

१२ एप्रिल १९१९ रोजी अमृत्तसर येथे जालियनवाला मैदानात सभेवर जनरल डायरने गोळीबार केला. 

या हत्याकांडाचा भारतभर निषेध झाला रविंद्रनाथ टागोरांनी ब्रिटिश सरकारने दिलेली सर या पदवीचा त्याग केला.

 

वर्ष १९२०

१ ऑगस्ट १९२० रोजी टिळकयुगाचा अस्त झाला. 

गांधी युगाची सुरुवात झाली

कोलकाता येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरून असहकाराचा ठराव संमत झाला. 

ब्रिटीश माल, सरकारी कार्यालय व न्यायालय, ब्रिटीश शाळा, महाविद्यालये, पदव्या, कायदेमंडळाच्या निवडणुकी वर बहिष्कार घालण्यात आला.

वर्ष १९२२

चौरीचोरा येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर ब्रिटीश पोलिसांनी गोळीबार केला व संतप्त जमावाने पोलिस चौकीला आग लावली ज्यात ११ पोलीस ठार झाले. 

म. गांधीनी या घटनेन व्याशित होऊन असहकार चळवळ स्थागित केली.

 

वर्ष १९३०

६ एप्रिल १९३० रोजी दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजीनी कायदेभंग केला. कायदेभंग चळवळीला देशभरात सुरुवात झाली.

 

वर्ष १९४२

७ ऑगस्ट १९४२ मुंबई येथे मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय कॉग्रेसच्या बैठकीत चळवळीचे नेतृत्व म. गांधी कडे देण्यात आले. 

म. गांधीनी भारतीय जनतेला करेंगे या मरेंगे चा संदेश दिला.

९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुगांत टाकले. 

भारतीय जनता संतप्त होऊन रस्त्यावर आली देशात अनेक ठिकाणी निषेध सभा झाल्या सत्याग्रहींनी प्रतिसरकारे स्थापन केली.

 

वर्ष १९४५

दुसऱ्या महायुदधाचा शेवट

महायुदधात्त इंग्लंडचे खच्चीकरण झाले भारतात फार काळ सत्ता टिकविता येणार नाही याची जाणीव इंग्रज राज्यकर्त्यांना झाली

 

वर्ष १९४७

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. 

भारताच्या इतिहासातील सुवर्णदिन

 

वर्ष १९४९

१ ऑक्टोबर १९४९ रोजी चीनी जनतेच्या पाठींब्याने माओ – त्से – तुंग यांनी लालक्रांती यशस्वी करून चीन प्रजासत्ताक अस्तित्वात आणले. 

अमेरिका, रशियाप्रमाणेच चीन जगातील तिसरी महाशक्ती म्हणून उदयास आली.

 

वर्ष १९५०

२६ जानेवारी १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना अंमलात आली

जगाच्या इतिहासात भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------