Yojana

अपंगांसाठी सुगम्य भारत अभियान

या अभियानाचा पहिला टप्पा आहे, अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे.

अपंग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे, प्रवास करणे, संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी ‘अडथळाविरहित वातावरण’निर्मितीसाठी अपंगत्व सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने ‘सुगम्य भारत अभियान’ राबविण्यात येत आहे.

अडथळाविरहित वातावरण

या अभियानाचा पहिला टप्पा आहे, अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे. शाळा, दवाखाने, कार्यालये आदी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना व त्या ठिकाणातून बाहेर पडताना केवळ अपंग व्यक्तींनाच नव्हे तर सर्वच व्यक्तींना सहज आत-बाहेर जाणे शक्य होण्यासाठी अडथळे दूर करणे यात अपेक्षित आहे. त्यात इमारतीतील फूटपाथ, उतार, वळणे व रहदारीला अडथळे निर्माण करणारे घटक दूर करण्याचा विचार केलेला आहे. त्यासाठी सुयोग्य रॅम्प्स, रेलिंग, आधारासाठी कठडे किंवा आधार, पार्किंग आणि आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी सुविधांचा समावेश आहे. यामध्ये सुविधा निर्माण करण्याबरोबरच त्याचे ऑडिट करणे व दर्जा राखण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल.

अपंग व्यक्तींबरोबरच या अभियानाचा लाभ वृद्ध व ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गरोदर महिला यांना होणार आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत सुकाणू समिती स्थापन कण्यात आली आहे.

परिवहन सेवेत सुलभता

सुलभ व सहज प्रवास व संपर्क केवळ अपंगाचीच नव्हे तर सर्वाची गरज आहे. रेल्वे, विमान, बस, टॅक्सी व रिक्शा, अशा सर्व प्रकारच्या प्रवासी साधनातून अपंग व्यक्तींना प्रवास करणे शक्य व्हावे यासाठी जमिनीचा पृष्ठभाग, पायऱ्या, रॅम्प्स, प्रवेशद्वार, वाहनतळ आदीचा विचार केला आहे.

माहिती व संपर्क इको प्रणाली सुलभता

माहितीची सहज उपलब्धता समाजात अनेक संधी मिळवून देते. त्यासाठी लोकांना दैनंदिन जीवनात अनेक प्रकारची माहिती हवी असते. या अभियानांतर्गत सर्व प्रकारची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रयास केले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी : http://pibmumbai.gov.in/scripts/detail.asp?releaseId=M2015FR35

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp OR Telegram (https://t.me/VidyarthiMitra) , Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) <नाव><शहराचे नाव><नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------