नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड या केंद्र सरकारच्या कंपनीची भारतातील पहिली माहिती सुविधा म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. दिवाळखोरी आणि नादारी संहिता 2016 अंतर्गत माहिती सुविधा पुरवण्यासाठी मुंबईत नुकताच या सुविधेच्या शुभारंभासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आयबीबीआयचे अध्यक्ष एम. एस. साहू, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख आणि आघाडीच्या बॅंका आणि वित्त संस्थांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
एम. एस. साहू म्हणाले, आघाडीच्या बॅंका आणि सरकारी संस्थांनी नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेडची स्थापना केली आहे. कोणत्याही कर्जाबाबत धनकोने दिलेल्या माहितीची त्रयस्थामार्फत पडताळणी करून कायदेशीर पुराव्यांची विश्वस्त संस्था अशी या कंपनीची भूमिका असेल. पडताळणी केलेली माहिती निर्धारित वेळेत पुरवणे हे एनईएसएलचे काम आहे.
दिवाळखोरी आणि नादारी संहिता 2016 चे उद्दिष्ट स्पष्ट करताना ते म्हणाले की, ऋणकोने दिलेली खरी आर्थिक माहिती स्वीकारण्याची, साठवून ठेवण्याची आणि सहजपणे उपलब्ध करून देण्याची गरज आहे. जेणेकरुन दिवाळखोरी संहितेअंतर्गत दावे निकाली काढता येतील, असे त्यांनी सांगितले. दिवाळखोरीची समस्या आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आयबीसी उद्दिष्टे निश्चित करते.
माहिती सुविधेच्या गरजेबाबत एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले की, खरी आर्थिक माहिती पुरवताना तिची गोपनीयता राखण्याचे आव्हान एनईएसएल पुढे आहे. सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी म्हणाले की, आर्थिक माहितीची गोपनीयता राखणे हे कठीण काम आहे. केवळ 14 दिवसांत कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी भारतातील पहिल्या माहिती सुविधेची स्थापना हे चांगले लक्षण आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------