International

मानुषी छिल्लर नवी विश्वसुंदरी; भारताला १७ वर्षांनी ‘मिस वर्ल्ड’चे विजेतेपद

जो इतिहास प्रियांका चोप्राने १७ वर्षांपूर्वी रचला त्याची पुनरावृत्ती शनिवारी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया मानुषी छिल्लरने ‘मिस वर्ल्ड २०१७’चा मुकुट मिळवून केली. हा बहुमान मिळवणारी ती पाचवी भारतीय सौंदर्यवती आहे. शनिवारी चीनमध्ये रंगलेल्या भव्य सोहळ्यात मानुषीने भारताला विजेतेपद मिळवून दिले. मिस वर्ल्ड २०१६ स्टेफनी डेल वॅलने मानुषीला मुकुट घातला.

जगातील सगळ्यात जुनी आणि मानाची ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्याचा विश्वास बसत नसल्याचे मानुषी चीनहून सांगते. २० वर्षीय ही सुंदरी हरियाणाच्या सोनिपतची रहिवाशी आहे. ती सध्या मेडिकलचे शिक्षण घेत आहे. दिल्लीपासून मिस वर्ल्ड २०१७पर्यंतचा तिचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. मानुषीच्या या यशात फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मिळालेले मार्गदर्शन फार महत्त्वाचे ठरते. मानुषी एफबीबी कलर्स फेमिना मिस इंडिया २०१७ आहे. पुढे जगभरातील १२१ स्पर्धकांमध्ये रंगलेल्या विश्वसुंदरीच्या या स्पर्धेत मानुषीने बाजी मारली. विश्वसुंदरी स्पर्धेत 'मिस इंग्लंड' स्टेफनी हिल ही दुसऱ्या तर 'मिस मेक्सिको' अॅण्ड्रिया मेझा तिसऱ्या स्थानी राहिली. मिस वर्ल्ड २०१७चे परीक्षण विविध देशांतील तज्ज्ञ मंडळींनी केले आहे.

 

हा मान मिळवणारी मी पाचवी भारतीय असल्याचा आनंद वजा अभिमान वाटत आहे. मुकुटासह मी सगळ्यांची मने जिंकल्याचा मला जास्त आनंद आहे. या संपूर्ण प्रवासात मित्र, परिवार आणि चाहत्यांचा कायम पाठिंबा मिळाला. या आल्हाददायी प्रवासाबद्दल मी द टाइम्स ग्रूप आणि मिस इंडिया संस्थेचे मनापासून आभार मानते. माझ्या हितचिंतकांच्या पाठिंब्याशिवाय यातले काहीच शक्य नव्हते, असे मानुषीने उत्साहाने सांगितले.

या उत्तरामुळे ठरली विश्वसुंदरी...

टॉप ५ ला गेल्यावर मिस इंडिया मानुषीला, ‘सर्वाधिक पगार कुणाला मिळायला हवा?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर या ब्यूटी विद ब्रेन्जने, ‘आईला सर्वाधिक मान मिळायला हवा. त्यांना कॅशमध्ये पगाराऐवजी खूप सन्मान आणि प्रेम द्यायला हवं’ असं सांगत बाजी मारली.

याआधीच्या भारतीय मिस वर्ल्ड वर्ष नाव

२००० प्रियांका चोप्रा

१९९९ युक्ता मुखी

१९९७ डायना हेडन

१९९४ ऐश्वर्या राय

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

GET Free Educational Updates (Entrance Exam, Admissions, Jobs & many more...) Alerts on WhatsApp, Send message on 7720025900

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. <नाव> <शहराचे नाव> <नोकरी>७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा

https://goo.gl/YPjt94
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------