सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची अंतीम मुदत ५ डिसेंबर पर्यंत

सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेसाठी अर्जाची अंतीम मुदत ५ डिसेंबर पर्यंत

अंतिम तारिक 30th October 2017

सैन्यात करीयर करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावरच प्रशिक्षण सातारा येथील सैनिक स्कुल देते. सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये इयत्ता 6 वी आणि 9 वी साठी वर्ष 2018-19 सत्राच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 5 डिसेंबर 2017 ही अर्ज करण्याची अंतीम मुदत आहे. (मुलींना या शाळेत प्रवेश दिला जात नाही.)

प्रवेश परीक्षा अर्जाची उपलब्धता-प्रवेश परीक्षा अर्ज दिनांक 16 ऑक्टोबर  ते 30 नोव्हेंबर, 2017 पर्यंत शाळेच्या वेबसाईटवर आणि सैनिक स्कूल सातारा येथे कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 पर्यंत उपलब्ध असतील. दिनांक 5 डिसेंबर 2017 संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत प्रवेश परीक्षा अर्ज पोस्टाने किंवा शाळेच्या कार्यालयात जमा करता येणार आहे. कुरियर अथवा पोस्टाने, उशिरा येणारे अर्ज रद्द केले जातील व त्यास शाळा प्रशासन जबाबदार राहणार नाही.


प्रवेश परीक्षा ओ.एम.आर. पध्दतीने घेतली जाईल, उत्तरे बहुपर्यायी असतील. वयोमर्यादा व निवड पद्धती इयत्ता 6 वी उमेदवाराची जन्मतारीख ही दिनांक 02 जुलै, 2007 ते 1 जुलै, 2008 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी. इयत्ता 9 वी उमेदवाराची जन्मतारीख ही दिनांक 02 जुलै 2004 ते 1 जुलै, 2005 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान असावी व उमदेवार हा प्रवेशावेळी मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण झालेला असावा. निवड पद्धती-लेखी परीक्षा, मुलाखत, वैद्यकीय तपासणी, इयत्ता 6 वीची रिक्त पदे 71 व इयत्ता 9 वीची रिक्त पदे 05 आहेत. रिक्त पदांच्या संख्येत वाढ किंवा घट होऊ शकते.


राखीव जागा-अनुसूचित जाती 15% , अनुसूचित जमाती 7.5%, आजी व माजी सैनिकांची मुले 25% (अ.जा. व अ.ज. यांच्या राखीव जागा सोडून). प्रवेश परीक्षा केंद्र - इयत्ता 6 वी - अहमदनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे, सातारा. इयत्ता 9 वी साठी फक्त सातारा प्रवेश परीक्षा दिनांक 07 जानेवारी 2018 (रविवार) घेण्यात येईल. माहितीपत्रक-शाळेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

     प्रवेश परीक्षा अर्ज दरपत्रक

उमेदवाराची श्रेणी

ऑनलाईन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टनेच स्विकारली जाईल)

ऑफलाईन प्रवेश परीक्षा अर्ज (रक्कम फक्त डिमांड ड्राफ्टने किंवा रोखीने स्विकारली जाईल)

सामान्य प्रवर्गातील मुले (जनरल),

संरक्षण दलातील आजी/माजी कर्मचाऱ्यांची मुले, विमुक्त जाती, भटक्या जाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्गातील मुले

रु.400/-

रु.400/-

फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गातील मुले

रु.250/-

रु.250/-