Civil Services

Civil Services

एमपीएससतर्फे सर्व विभागांतील गट ‘क’ पदांसाठीच्या परीक्षा २०२२

PUBLISH DATE 7th December 2022

राज्यातील ‘क’ गटाची सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) भरण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता या पदभरतीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

महसूल विभागातील गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी ‘एमपीएससी’ला परवानगी देण्यात आली असून, जानेवारी महिन्यात एमपीएससी प्रथमच गट ‘क’च्या पदांसाठी जाहिरात काढणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याने ‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

नोव्हेंबरमध्ये राज्य सरकारकडून सर्व विभागांतील गट ‘क’ पदांसाठीच्या परीक्षा ‘एमपीएससी’कडून घेण्यात येतील, असा निर्णय घेतला. यापूर्वी या परीक्षा त्या-त्या विभागांकडून नेमण्यात आलेल्या खासगी कंपन्यांकडून घेतल्या जात होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक गैरप्रकार आढळून येत होते. यामुळे आता गट ‘क’च्या सर्व परीक्षा ‘एमपीएससी’कडून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महसूल विभागाने लिपिक-टंकलेखक (महसूल सहायक) या पदांसाठी परीक्षा घेण्यास ‘एमपीएससी’ला मान्यता दिली आहे. ‘एमपीएससी’कडून जानेवारी महिन्यात या पदांच्या परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

यापूर्वी ‘एमपीएससी’कडून केवळ गट ‘अ’ आणि ‘ब’च्या परीक्षा घेतल्या जात होत्या. गट ‘क’च्या परीक्षा सरळसेवेमार्फत त्या-त्या विभागाकडून घेतल्या जात होत्या. यापुढे ही प्रचलित पद्धत बंद होणार असून, आता गट ‘क’च्या परीक्षाही ‘एमपीएससी’द्वारे पार पडणार आहेत. यातून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर कमी होऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे नोकऱ्या मिळतील, असा विश्वास व्यक्त करून विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

महसूल विभागातील लिपिक टंकलेखक (गट क) संवर्गातील पदे ‘एमपीएससी’मार्फत भरण्यास परवानगी दिल्याबद्दल महसूल विभागाचे आणि सरकारचेही आभार. सरकारच्या या निर्णयाचे स्वागतच आहे. ‘एमपीएससी’मार्फत परीक्षा होणार असल्याने यापुढे होणाऱ्या परीक्षा पारदर्शक होतील. ‘एमपीएससी’ने जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करून परीक्षा प्रक्रियेला सुरुवात करावी.
- महेश घरबुडे, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.