Schools

Schools

सैनिकी शाळा प्रवेश २०२२: सैनिकी शाळांसंदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

PUBLISH DATE 9th December 2022

राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांचा दर्जा घसरत असल्याने या शाळांच्या अभ्यासक्रम, शिक्षण स्वरूप आणि इतर पूरक बाबींचे पुनर्लोकन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाकडून त्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

या समितीमार्फत राज्यातील सर्व सैनिकी शाळांचा आढावा घेतला जाणार आहे.

राज्य सरकारने १९९६ मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे सद्यस्थितीत राज्यात ३८ अनुदानित सैनिकी शाळा आहेत. या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने घट होत आहे. या शाळांमधून ‘एनडीए’मध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर घटली आहे; तसेच शाळांमध्ये वाढत असलेल्या तुकड्यांचा वाढीव खर्चाचा बोजा सरकारवर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आता शाळांचा आढावा घेण्याचे काम राज्य सरकारची समिती काम करणार आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवर शाळांना पुन्हा एकदा सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

सरकारकडून नेमण्यात आलेल्या समितीने प्रत्यक्ष शाळांची भेट घेऊन शाळांची सद्यस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये काय सुधारणा करणे गरजेचे आहे, ते अहवालातून सादर करायचे आहे. सद्यस्थितीत सैनिकी शाळांबाबत राबवले जात असलेले धोरण २८ वर्षे जुने आहे. त्याला अद्ययावत करण्याची जबाबदारीही या समितीवर राहणार आहे. केंद्र सरकारने १०० सैनिकी शाळा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर सुरू करण्याचे ध्येय बाळगले आहे. नव्या धोरणात केंद्राच्या या मुद्द्याचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सैनिकी शाळांमध्ये शिकणारे जास्तीत जास्त विद्यार्थी ‘एनडीए’मध्ये कसे दाखल होतील, याबाबत समितीला अभ्यास करायचा आहे. सैनिकी शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाबाबतही समितीने सखोल अभ्यास करून त्यातील बदलांसह सविस्तर अहवाल तीन महिन्यांमध्ये सरकारला सादर करणे अपेक्षित असणार आहे.

अशी आहे समिती

सैनिकी शाळांचे पुनर्लोकन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीमध्ये ‘एससीईआरटी’चे अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचलनालयाचे संचालक सदस्य, सातारच्या सैनिक शाळेचे प्राचार्य, आर्मी वेलफेअर सोसायटीचे सदस्य, ब्रिगेडीयर सुधीर सावंत (निवृत्त), सैनिकी शाळा असोसिएशनचे सचिव विश्वनाथ माळी यांचा समावेश आहे.

असे होणार पुनर्लोकन

१. सैनिकी शाळांच्या पुनर्लोकनासाठी नेमण्यात आलेली समिती प्रत्यक्ष शाळांना भेट देणार

२. सैनिकी शाळांसाठीचे २८ वर्षांपूर्वीचे धोरण बदलले जाणार

३. गरज पडल्यास सैनिकी शाळांच्या अभ्यासक्रमातही बदल केला जाणार

४. अधिकाधिक विद्यार्थी ‘एनडीएत’ प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.