Higher Education

Higher Education

डिजिटल स्किल २०२२: डिजिटल सिस्टिम्स थिंकिंग

PUBLISH DATE 7th December 2022

डिजिटल सिस्टिम्स थिंकिंग म्हणजे सर्वांगीण दृष्टिकोन आणि विचारधारा आहे. ती सिस्टिमचे घटक भाग एकमेकांशी संबंधित असलेल्या विविध मार्गांवर लक्ष केंद्रित करते.

डिजिटल परिवर्तनासाठी ही विचारसरणी अंतर्दृष्टी विकसनाद्वारे व्यवसाय अधिक कार्यक्षम तसेच प्रक्रियांमध्ये सुधारणाही करते.

डिजिटल सिस्टिम्स थिंकिंग या क्षेत्रामुळे परिवर्तनासाठी मूल्य प्रदान करू शकणारी विविध उपकरणे आणि प्रणालींना जोडणे शक्य झाले आहे. ते तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे बुद्धिमत्तेचे जाळे तयार करण्याबद्दल आहे. यामुळे ग्राहकांच्या मागणीची पूर्तता करण्या बरोबरच पुनर्रचना करणाऱ्या प्रक्रियेशी संबंधित आहे. याद्वारे भांडवल आणि मूल्य निर्मितीही वाढवली जाते.

डिजिटल सिस्टिम थिंकिंग ही विश्लेषणाद्वारे मोठ्या व क्लिष्ट सिस्टिमच्या संदर्भात कसे कार्य करणार आहे, यावरही लक्ष केंद्रित करते. संगणक, स्मार्टफोन, स्कॅनर, कॅश रजिस्टर्स आणि डिजिटल तिकीट वाचकांच्या रूपात डिजिटल प्रणाली या डिजिटल थिंकिंग सिस्टिम्सवर आधारित आहेत.

चांगला सिस्टिम विचारधारक एकाच वेळी घटना, वर्तनाचे नमुने, प्रणाली आणि मानसिक मॉडेल या चार स्तरांचे कार्य पाहू शकतो. अनुभवी सिस्टिम विचारधारक बनणे म्हणजे स्वतःची जागरूकता आणि कौशल्ये विकसित करण्याच्या दृढ वचनबद्धतेने सुरू होते. व्यवसायामध्ये सिस्टिम थिंकर हा काय चालले आहे याचा सहज अर्थ लावू शकतो. त्यांच्याकडे त्यांच्या ऑपरेशनच्या ‘इनसायडर नट आणि बोल्ट’चे स्पष्ट दृश्य आहे जे इतरांच्या वैशिष्ट्यपूर्ण जागरूकता ओलांडूनही पाहता येणे सहज शक्य आहे.

शिकण्यासाठी सातत्यपूर्णता, मजबूत वचनबद्धता, आणि तुमच्या स्वतःच्या मानसिक मॉडेलला आव्हान देण्याची इच्छा या तीन वैशिष्ट्यांमध्ये ही विचार प्रणाली समाविष्ट आहे. समस्यांमध्ये तुमची स्वतःची भूमिका स्वीकारणे आणि पाहण्याच्या आणि कार्यशीलतेच्या वेगवेगळ्या मार्गांसाठी खुले असणे हे डिजिटल सिस्टिम्स थिंकिंगमध्ये महत्त्वाचे आहे.

सिस्टिम्स थिंकिंग ही प्रक्रिया युजर एक्सपिरीयन्स डिझायनर व्यापक दृष्टिकोनातून एकूण नमुने पाहण्यासाठी वापरली जाते. हे दोन घटकांमध्ये प्रणाली आणि संस्थांचे विभाजन करून पारंपारिक विश्लेषणही प्रचलित करते. डेव्हलप ऑपरेशन्स हा प्रॅक्टिसचा एक संच आहे जो वर्कलोड जलद आणि अधिक विश्वासार्हपणे तयार करण्यासाठी, चाचणी करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सॉफ्टवेअर विकास प्रक्रिया स्वयंचलित करतो जो ऑटोमेशन, क्लाऊड-नेटिव्ह, संस्कृती, सुरक्षा आणि निरीक्षणक्षमता या पाच मुख्य क्षेत्रांसह जोडला गेला आहे. सिस्टिमच्या विचारांची साधने आणि धोरणांमध्ये आइसबर्ग व्हिज्युअल्स, वर्तन-ओव्हर-टाइम आलेख, अनुमानाची टप्पा शिडी, कनेक्शन सर्कल, स्टॉक-फ्लो मॅप, आणि कॉझल लूप डायग्राम यांचा समावेश होतो. यासारख्या अनेक व्हिज्युअल टूल्सचा उपयोग सिस्टिम्सबद्दल अंतर्दृष्टी गोळा करण्यासाठी, विश्लेषण व संश्लेषण करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी केला जातो. कुमू, इनसाइट मेकर आदी डिजिटल टूल्स ही डिजिटल सिस्टिम्स थिंकींगसाठी आणि सिस्टिम्स मॉडेलिंग स्केच टूल म्हणून लुपी सारखी जलद, विनामूल्य आणि वापरण्यास सोपे असणारी टूल्स अनेकदा उपयोगी पडतात.

लेखिका -डॉ. दीपक ताटपुजे

------------------------------------------------------------------------------------------------------------------

VidyarthiMitra.org

Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900

Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play

Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance | 

Call 77200 25900 or 77200 81400                   

11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |

We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected 
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900

| Cutoffs & Opening Closing Ranks => CSAB 2022 | JoSSA 2022 | MHT-CET 2022 | MBA 2022 | Pharmacy 2022 | Polytechnic 2022

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.