बॅंक भरती परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. सरकारी बँकांमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्र ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. त्याचे मुख्यालय पुण्यात आहे. त्याच्या देशभरात एकूण २०६७ शाखा आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदांच्या एकूण ५५१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
या पदभरती अंतर्गत एजीएम बोर्ड सेक्रेटरी अॅण्ड कॉर्पोरेट गव्हर्नन्स, एजीएम डिजीटल बॅंकींग, एजीएम मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टिम, चीफ मॅनेजर-एमआयएस, चीफ मॅनेजर-मार्केट इकोनॉमिक अॅनालिस्ट, चीफ मॅनेजर-डिजीटल बॅंकींग, चीफ मॅनेजर-इन्फॉर्मेशन सिस्टिम ऑडीट, चीफ मॅनेजर-सिक्योरिटी ऑफिसर, चीफ मॅनेजर-क्रेडीट, चीफ मॅनेजर डिसास्टर मॅनेजमेंट, चीफ मॅनेजर- पब्लीक रिलेशन अॅण्ड कॉर्पोरेट कम्युनिकेशन, जनरलिस्ट ऑफिसर, ट्रेजरी ऑफिसर ही पदे भरली जाणार आहेत.
या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार १ लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.
अधिकारी पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी २३ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Admission Guidance 2022: WhatsApp https://wa.me/917720025900
Get real-time alerts and all the news on your phone with the all-new VidyarthiMitra app. Download from Google Play
Aptitude Test | Career Counselling | Option From Filling | Admission Assistance |
Call 77200 25900 or 77200 81400
11th Admissions (FYJC) & DTE Cut-off | Cutoffs 2022 |
We bring you the fastest and relevant notifications on Bank, Railways, and Govt Jobs. Stay Connected
Join us on WhatsApp https://wa.me/917720025900
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Get free Educational & jobs alert on WhatsApp OR Telegram(https://t.me/VidyarthiMitra) Save this mobile number (77200 25900) on your phone as VidyarthiMitra.org and send WHATSAPP message (Your Name, City & Interest)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा.
UPSC CSE Recruitment to Indian Railway Management Service 2023
UPSC Civil Services Prelims Exam 2023: Registration begins
IGNOU launches PG diploma in Journalism and Mass Communication 2023
UPSC Geo Scientist Final Result Out 2022
RPSC Statistical Officer Screening Test Result Declared 2022
CLAT Counselling 2023: Second allotment list released